वाळूज महानगर, (सांजवार्ता ब्युरो) : बेकायदेशीर गावठी शस्त्रविक्री प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सचिन घोरपडे याला हसूल मध्यवर्ती कारागृहात धाडण्यात आले आहे. वाळूज पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली (ता. राहुरी) येथून त्याला अटक केली होती.
वाळूजजवळील जिकठाण येथे २० जुलै राजी मध्यरात्री साडेबारा वाजता एका कारमध्ये राहुल धर्मराज गायकवाड (२५, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), सिद्धांत शिवाजी धनेधर (२६, रा. रमानगर, क्रांती चौक) यांच्यासह ३ महिला निर्मनुष्य ठिकाणी अंधारात उभे होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी कार जप्त करून पाचही जणांना
वाळूज पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान साथीदार शाहरूख सांडू सय्यद (२६, रा. बेलापूर चांदनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यास पकडले होते. तर शस्त्रविक्री करणारा म्होरक्या सचिन घोरपडे फरार होता.
वाळूज पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हसूल कारागृहात करण्यात
आली. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी राहुल गायकवाड, सिद्धार्थ धनेधर व शाहरुख सांडू सय्यद यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तर घोरपडे याच्यावर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी सचिन घोरपडेकडून अधिक गुन्ह्याची माहिती उघडकीस येण्याची शक्यता वाळूज पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक फौजदार सुखदेव भागडे, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुखदेव कोल्हे, विजय त्रिभुवन, राजु फुलकर यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













